22 March 2013

आणि साला , माझ्या गालावरच dimple त्यांना कधी दिसलचं नाही ... !

तशी ती सावळीच, दिसायला ही साधारणचं.
तशी ती मला आवडायची, ती असूनही Healthy + .
हे तिलाही माहीत होतं की, ती फार सुंदर वगैरे नाही.
ती स्वत:च म्हणायची की, माझा बांधा वगैरे काही सुडौल नाही.
पण, सावळी असूनही तिला कुणी सावळ म्हटलं तर ती रागावयाची.

पण, बाकी 
सावळ दिसणं सोडल तर ती फार गोड होती ...
खुप बडबड करणारी, बिंधास्त बोलणारी, साधी राहणारी,
स्वत:ची कामे स्वत:च करणारी, आणि अगदी माझ्याइतकीच हुशार!

तिच्या मैत्रीणी फारच देखण्या, आणि एकदम girly type.

त्यांचा girly-पणा तिला कधी आवडायचा नाही, तस ती माझ्याजवळ बोलायची पण ...

तिच्या मैत्रीणींची कोणी तारीफ़ केली तर मात्र तिला कसतरी व्हायचं.

ती त्यांच्यावर जळत होती अस वगैरे काही नव्हतं, पण तिला याची जाणीव होती की ती फार सुंदर नाही त्यांच्याइतकी!
मग माझ्याजवळ ती म्हणायची, "यार माझ्याबद्दल पण असं बोलणारा कोणी मला भेटेल काय कधी ...?"

एके दिवशी, त्या गप्पा मारत असताना सहज विषय निघाला आणि तिने सांगुन टाकले की, "माझा boyfriend किंवा नवरा सावळा असला तरी चालेल, पण त्याची smile फार भारी पाहिजे. आणि, त्याची dimple असेल तर फारच भारी ... "


मी तिथेच उभा होतो, त्यांच्या बाजुला. त्या सगळ्या माझ्याही मैत्रीणी होत्याच!


त्या बोलत राहिल्या smile 
आणि dimple बद्दल बराच वेळ ... बरेच दिवस ... काही वर्षे ... !!!

आणि साला ,

माझ्या गालावरच dimple त्यांना कधी दिसलचं नाही ... !

2 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...