18 February 2014

तू एकदा...

जग जिंकले असत तुझ्यासाठी ,
तू एकदा जिंक म्हणायला हव होत ...

तुझ्यावर मरणारे बरेच भेटले असतील तुला ,
मी जगतोय तुझ्यासाठी ,
तू एकदा पहायला हव होत ...

माझी नजरच हटायची नाही तुझ्यावरुन ,
गुलाबी तू , कातील ,
कधी उधळून रंग गुलाबी ,
माझ्याकडे तू पहायला हव होत ...

सगळे खेळ मनाचे माझे , भास तुझे ,
स्वप्न तू , श्वास माझे ,
कधी पत्त्यांचे बंगले माझ्यासव ,
तू बनवायला हवे होते ...

गेलीस फुंकर मारून ईमल्यांवर स्वप्नांच्या माझ्या ,
पत्तेच ते , जे पडले , गडगडले मन ,
पत्ता शोधीत माझा कधी ,
भेटीला तू यायला हवे होते ...

चहाचा शौकीन मी , अन् तू कॉफीची ,
एक वाफाळलेली कॉफी , एका कपातून , एका पावसात , 
तू सोबत प्यायला हवी होतीस ...

ती कवितांची वही जी ,
मी फाडलेली तू गेल्यावर ,
अन् आठवले परवा मग ,
एक चिठ्ठी इतक्या दिवसात ,
तू लिहायला हवी होतीस ...

ते निरभ्र आकाशाचे रंग निळे ,
अन् तू गेल्यावरचे मेघ काळे ,
परत येऊन एकदा गच्चीत माझ्या ,
कोवळ्या उन्हात ,
तू नहायला हवे होते ...

ते दिवस धुंद होते , अन् राती मंतरलेल्या ,
मग चांदराती घेऊन हात ,
चुंबल्या ओठी ,
गीत मुके ते ,
तू गायला हवे होते ...

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...