30 January 2017

कधी कशाला

कधी बुडवावी एखादी खारी, पूर्ण चहात ,
जाऊ द्यावं तिला, उंच कपाच्या तळाशी ,

कधी खावी एखादी चपाती, गरम दुधात , कुस्करून ,
अन तोंडी लावावी , लाल चटणी ,

कधी बसावं खाली , मांडी घालून , जेवायला ,
घरच्यांसोबत , एकत्र , 

कधी टेकवावे पाय , जमिनीला , आपल्याच ,
अन चालावं थोडं , अनवाणी ,

कशाला हवंय कार्पेट , रोजच ?
कशाला हवंय कार्पोरेट जगणं , रोजच , आपल्याच घरी ?

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...