22 February 2017

कसली माल दिसतेय

मला माहीत आहे,

तुला figurative बोलायला आवडतं म्हणून,

पण म्हणून काय मला, तू तिला, "कसली माल दिसतेय" म्हटलेलं पटणार नाही...

14 February 2017

ग्वाड झालं, ग्वाड झालं...हळुवार जिणं माझं,
द्वाड झालं, द्वाड झालं,
तुझ्या संगतीने सजना,
आता कसं, ग्वाड झालं...

द्वाड झालं, द्वाड झालं,
तुझ्या संगतीने सजना,
आता कसं, ग्वाड झालं...

वाळवंटी जगणं हे,
कोरडं बघणं हे,
सरीने तुझ्या, प्रेमाच्या,
हिरवं शिवार झालं...

द्वाड झालं, द्वाड झालं,
तुझ्या संगतीने सजना,
आता कसं, ग्वाड झालं...

नात्यांच्या या दुनियेत,
सुख कसं बाजारू झालं,
हसणं तुझं तेंव्हा बघ,
जगण्या आधार झालं...

द्वाड झालं, द्वाड झालं,
तुझ्या संगतीने सजना,
आता कसं, ग्वाड झालं...

चेहऱ्याचा साज तू,
अन जगण्याचा ताज तू,
मनही माझं, तनही माझं,
कवाचं बघ तुझंच झालं...

द्वाड झालं, द्वाड झालं,
तुझ्या संगतीने सजना,
आता कसं, ग्वाड झालं...

हळुवार जिणं माझं,
द्वाड झालं, द्वाड झालं,
तुझ्या संगतीने सजना,
आता कसं, ग्वाड झालं...


13 February 2017

You call it a normal life until...

You 
call it 
normal life 
until 
you receive 
an interest 
on a matrimony website 
from a girl 
who broke up with a lesbian girl 
who was a friend of
your ex-girlfriend...

11 February 2017

Let there be roses

Roses from our home:

A photo posted by Manoj (@manojl) on


A photo posted by Manoj (@manojl) on

09 February 2017

आपल्या मर्यादा, आपणच ठरवाव्या...

काहींना बंदीस्त जगणं आवडतं,
काहींना बिंद्धास्त जगणं...

आपले दगड कोण,
आपल्या भींती कोणत्या,

आपल्या मर्यादा,
आपणच ठरवाव्या...


Related Posts Plugin for WordPress, Blogger...