14 February 2017

ग्वाड झालं, ग्वाड झालं...हळुवार जिणं माझं,
द्वाड झालं, द्वाड झालं,
तुझ्या संगतीने सजना,
आता कसं, ग्वाड झालं...

द्वाड झालं, द्वाड झालं,
तुझ्या संगतीने सजना,
आता कसं, ग्वाड झालं...

वाळवंटी जगणं हे,
कोरडं बघणं हे,
सरीने तुझ्या, प्रेमाच्या,
हिरवं शिवार झालं...

द्वाड झालं, द्वाड झालं,
तुझ्या संगतीने सजना,
आता कसं, ग्वाड झालं...

नात्यांच्या या दुनियेत,
सुख कसं बाजारू झालं,
हसणं तुझं तेंव्हा बघ,
जगण्या आधार झालं...

द्वाड झालं, द्वाड झालं,
तुझ्या संगतीने सजना,
आता कसं, ग्वाड झालं...

चेहऱ्याचा साज तू,
अन जगण्याचा ताज तू,
मनही माझं, तनही माझं,
कवाचं बघ तुझंच झालं...

द्वाड झालं, द्वाड झालं,
तुझ्या संगतीने सजना,
आता कसं, ग्वाड झालं...

हळुवार जिणं माझं,
द्वाड झालं, द्वाड झालं,
तुझ्या संगतीने सजना,
आता कसं, ग्वाड झालं...


No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...