26 June 2017

पावसात, तू मनात ...

पावसात,
तू मनात ...
भिजलेली तू ,
अन, चिंब रात ...

पावसात,
तू मनात ...

सैल मन माझे ,
उंच आकाशी ...
भिजलेले नभ,
तुझ्या केसात ...

पावसात,
तू मनात ...

ओल्या उबीचा ,
घट्ट हात ...
खिडकीतल्या मिठीतील गोड ,
नाजूक ती अन बात ...

पावसात,
तू मनात ...

मिठीतील तो ,
शहारे हात ...
डोळ्यांची ती ,
निःशब्द बात ...

पावसात,
तू मनात ...

पावसात,
तू मनात ...
भिजलेली तू ,
अन, चिंब रात ...


No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...